भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी लागू केली आहे. शस्त्रसंधीनंतर भारताने दहशतवाद विरोधात कारवाई सुरुच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अशातच अमेरिकेच्या मध्यस्थाच्या भूमिकावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. भारताने युद्ध का पुकारले होते ? भारतीय सैन्याला चार दिवस भेटले असते तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर लाहोर आणि कराचीवरही सैन्याने ताबा मिळवला असता, असे संजय राऊत यांनी भाष्य केले आहे.
त्यानंतर संजय राऊत म्हणाले की, "अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे मोदी यांच्या सरकारने कच खाल्ली. तसेच पाकव्याप्त काश्मीर मागताना ट्रम्प यांना विचारले होते का ? ट्रम्प यांचे पुढचे ट्विट काय असेल ते आता बघावे लागेल, असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला.