Shinde Group | Sanjay Raut  Team Lokshahi
राजकारण

श्रीकांत शिंदेंवर केलेल्या राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचे जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, डोकं फिरलय...

माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. असा आरोप राऊत यांनी केला होता.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच दुसरीकडे नुकताच निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना पक्षनाव आणि चिन्ह दिल्यामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला आहे. या निर्णयानंतर राजकीय वातावरण एकदमच तापले आहे. याच गदारोळ दरम्यान, आता ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी शिंदे गटावर खळबळजनक आरोप केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मला जीवे मारण्यासाठी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्यावरच आता शिंदे गटाकडून प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शिंदे गटाचे प्रवक्ते?

संजय राऊतांच्या आरोपावर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, संजय राऊत यांचे डोके फिरलं आहे. त्यांचे मानसिक संतुलन बिघडके आहे. उपचारांची त्यांना खूप गरज आहे. आमच्या ठाण्यातल्या मानसिक रुग्णालयात त्यांचा उपचार आम्ही करू. फक्त एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध टीका करायची आणि प्रसिद्धीच्या झोतात राहायचे. त्यांच्याकडून उरलेल्या मंडळींबद्दल सहानुभूतीचे वातावरण तयार करायचे यासाठी हे असे उद्योग सुरु आहेत. असे जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काय केला होता राऊतांनी आरोप?

संजय राऊत यांनी यावेळी तीन पत्र लिहले आहे. एक पत्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तर दुसरे पत्र मुंबई पोलीस आयुक्तांना लिहले आहे. पोलीस आयुक्तांना लिहलेल्या पत्रात त्यांनी लिहले की, महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर लगेच माझी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे हटवण्यात आली. याबाबत मी आधीच आपल्याला कळविले आहे. या काळात सध्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार तसेच त्यांनी पोसलेल्या गुंड टोळ्यांकडून मला धमक्या देण्याचे प्रकार घडले. मी त्याबाबतही आपणास वेळोवेळी कळविले आहे. आजच माझ्याकडे पक्की माहिती आली आहे की, ठाण्यातील एक गुंड राजा ठाकूर यास माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी खा. श्रीकांत शिंदे यांनी दिली असून लवकरच तो माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आहे. मी संसद सदस्य, सामनाचा कार्यकारी संपादक, शिवसेना नेता असलो तरी एक जबाबदार नागरिक म्हणून ही माहिती आपणास देत आहे. असे राऊत पत्रात म्हंटले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा