Sanjay Shirsat | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar Team Lokshahi
राजकारण

'टेंमपररी झालेली ॲडजस्टमेंट' शिवसेना- वंचित युतीवर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना वापरण्याच्या मनस्थितीत आहेत, पण प्रकाश आंबेडकरांना वापरून घेता येणार नाही.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध देखील पाहायला मिळत आहे. या सर्व गोंधळादरम्यान अनेक दिवसांपासून चर्चा होत असलेली शिवसेना ठाकरे गट आणि वंचित युती अखेर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण एकदम ढवळून निघाले आहे. या दोन्ही पक्षांच्या युतीवर आता राजकीय प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याच युतीवर आता शिंदे गट आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले संजय शिरसाट?

शिवसेना ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युतीवर बोलताना आमदार शिरसाट म्हणाले की, आज जी युती झाली ती युती म्हणजे टेंमपररी झालेली ॲडजस्टमेंट वाटते. कारण त्याची अवस्था घर का न घाटका अशी आहे, राष्ट्रवादी ने अंग काढत आहे, कॉंग्रेसने काढले हे दोन्ही पक्ष कुठे या घडामोडीत दिसत नाही. अशी टीका केली आहे.

पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मुंबई मनपा पाहिजे. परंतु, मनपा निवडणूकीत याचे परिणाम की दुष्परिणाम दिसतील. उद्धव ठाकरे हे प्रकाश आंबेडकरांना वापरण्याच्या मनस्थितीत आहेत, पण प्रकाश आंबेडकरांना वापरून घेता येणार नाही. उद्धव साहेबांकडे माणसं येण्याची गरज आहे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर हे मांग भरायला गेले होते का ? तुम्ही जे राजकारण केले त्यामुळे आज ही परिस्थिती आहे. राजकारणात स्वप्न पाहायला हरकत नसते. तुमच्या युतीला शुभेच्छा, आणखी दोन-चार पक्षांना घ्या आणि त्यांच्या प्रचाराला जा, असा टोला त्यांनी यावेळी दिला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा