Aditya Thackeray Team Lokshahi
राजकारण

'मुंबईला दिल्लीच्या दरवाजात कटोरा घेऊन उभं करायचा डाव' अदित्य ठाकरेंचा मुंबई अर्थसंकल्पावर आक्षेप

कंत्राटदारांसाठीच वाढीव पैसे खर्च करायचे हा घटनाबाह्य सरकारचा हेतू आहे.

Published by : Sagar Pradhan

आज मुंबई महानगरपालिकेचा 2023-24 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. आयुक्तांनी तब्बल ५२,६१९ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला. याच अर्थसंकल्पावर आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. याअर्थसंकल्पावरून आता शिवसेना ठाकरे गट नेते आदिय ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसह पालिका आयुक्तांवर टीका केली आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

आज सादर करण्यात आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, अर्थसंकल्पातील आकडे कंत्राटदारांसाठी फुगवले आहेत. कंत्राटदारांसाठी वाढीव पैसा दाखवायचा, कंत्राटदारांसाठीच वाढीव पैसे खर्च करायचे हा घटनाबाह्य सरकारचा हेतू आहे. भरसाठ खर्च दाखवून मुंबई महापालिका तोट्यात दाखवून मुंबईला दिल्लीच्या दरवाजात कटोरा घेऊन उभं करायचा हा सरकारचा डाव आहे. दिल्लीसमोर मुंबईची मान झुकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. असा देखील आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

पुढे ते म्हणाले की, अर्थसंकल्पात नगरसेवकांच्या फंडातले पैसे सौंदर्यीकरणासाठी वळवले आहेत. अर्थसंकल्पात सौंदर्यीकरणासाठीचे 1700 कोटी हे मागच्या नगरसेवकांच्या फंडातून वळवले गेले. हा अधिकार आयुक्तांना कोणी दिला. ते स्वतःहून असे पैसे वळवू शकतात का? अनेकदा आयुक्त हेच वेगवेगळे प्रस्ताव मांडतात. मुळात त्यासाठी स्थायी समितीची परवानगी लागते. मुंबईत आता लोकशाही राहिलेली नाही. मुंबईच्या विकासासाठी पालिकेने काही सूचना मागवल्या होत्या. त्यात आम्ही सूचवले होते की, मुंबईत सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. नव्या प्रकल्पांची सध्या आवश्यकता नाही. ही सूचना पालिकेने मान्य केली असल्याचे बजेटवरून दिसते. कारण यंदाच्या अर्थसंकल्पात एकही नवा प्रकल्प दिसत नाही. असे असले तरी पालिकेचे बजेट मात्र 50 हजार कोटींच्या पुढे गेले आहे. नव्या प्रकल्पांशिवाय बजेट इतके वाढले कसे? असा प्रश्न सुद्धा त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा