Rushikesh Khaire | Chandrakant Khaire Team Lokshahi
राजकारण

खैरेंच्या मुलाची खळबळजनक ऑडिओ क्लीप व्हायरल; बदलीसाठी घेतले 2 लाख रुपये

महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लीपमधून होत आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच आता औरंगाबादमधून वेगळी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा मुलगा, युवासेना पदाधिकारी ऋषिकेश खैरे यांची एक कथित ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे ते अडचणीत सापडले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बदली करून देतो म्हणून एका व्यक्तीकडून दोन लाख रुपये घेतल्याचा उलगडा या ऑडिओ क्लीपमधून होत आहे. बदली न केल्यामुळे माझे पैसे परत करा, असा तगादा संबंधित व्यक्ती करत असल्याचे यातून स्पष्ट होते. त्यामुळे आता खैरे पिता- पुत्र अडचणीत सापडले आहे.

काय आहे संभाषण?

ऋषी खैरे: हॅलो

विजय: बोला भाऊ

ऋषी खैरे: कुठे आहे तू...

विजय: इकडे शेंद्राला होतो

ऋषी खैरे: आ...

विजय: शेंद्राला

ऋषी खैरे: अच्छा, काळेचा फोन आला होता, काय झाले

विजय: अरे हौ ना, तुम्ही दोघेपण ह्ल्क्यातच घेऊ लागले, एवढी परेशानी चालू आहे माझी, दोन अडीच वर्षे झाले पैसे देऊन, दोन लाख रुपये..काय बोलणार आहे बरं तुम्हाला, विशाल देखील काही रिस्पॉन्स देत नाही..तुम्ही रिस्पॉन्स देऊ नाही राहिले

ऋषी खैरे: आज काय तारीख आहे, 23 तारीख आहे...पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: आता लय वेळीस सांगितले न तुम्ही, किती वेळेस भेटलो. तेथून आता इथे आलो होतो.

ऋषी खैरे: हंड्रेड पर्सेंट होईल

विजय: तुम्हाला माहित आहे का भाऊ, मी घरातील सोने चांदी देखील मोडले आहे, आता एवढी परेशानी चालू आहे. तुम्ही लोकांनी फोन उचलले नाही, काय करायचं बरं सांगा तुम्ही..माझं काम देखील नाही झाले बदलीचे, नंतर दीड-दोन वर्षे देखील वाया गेले माझे

ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तुझं काम करून देतो किंवा पैसे देतो

विजय: नै काम करूच नका, काम करून घेतो मी, आता लोकांना परत पैसे देऊन बसलो आहे मी, तिकडे बदलीसाठी

ऋषी खैरे: अच्छा दिलेले आहे का?

विजय: हो

ऋषी खैरे: पैसे देऊन टाकतो

विजय: तुम्ही तारीख सांगा भाऊ एक फिक्स, खरच लय परेशानी चालू आहे माझी

ऋषी खैरे: डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात देऊन टाकतो

विजय: लास्ट तारीख आठ पकडू का मी

ऋषी खैरे: होय

विजय: बरं ठीक आहे चालेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर