Uddhav Thackerey Team Lokshahi
राजकारण

मर्दांचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर..., दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गटाचा तिसरा टीझर

ठाकरे गटाने दसरा मेळाव्याचा तिसरा टीझर जारी केला आहे. यामध्ये ठाकरे गटाने पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे.

Published by : Sagar Pradhan

मुंबई : गेल्यावर्षी राज्यातील सर्वात मोठा पक्ष शिवसेनेत बंडखोरी झाली. या बंडामुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच गदारोळ निर्माण झाला. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. पक्ष कोणाचा यापासून ते दसरा मेळाव्यावरून दोन्ही गटात चांगलाच वाद झाला. दरम्यान गेल्यावर्षीप्रमाणे शिवतीर्थावर शिवसेना ठाकरे गटाचा दसरा मेळावा पार पडणार आहे. तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा होणार आहे. दोन्ही गटाकडून या मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे. त्यातच काल शिंदे गटाने दसरा मेळाव्याचा टीझर जारी केल्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने तिसरा टीझर जारी केला आहे.

काय आहे त्या टीझरमध्ये?

ठाकरे गटाने दसरा मेळाव्याचा तिसरा टीझर जारी केला आहे. यामध्ये ठाकरे गटाने पुन्हा एकदा शिंदे गटाला डिवचले आहे. मर्द विकला जात नाही, मर्द गद्दारी करत नाही! मर्दांचे एकच ठिकाण शिवतीर्थ दादर असे म्हणत शिंदे गटावर या तिसऱ्या टीझरमधून टीका केली आहे. तर दिवस तोच, गर्दी तीच, जल्लोष तोच, मैदान तेच… अशी टॅगलाईन दुसऱ्या टीझरमध्ये ठाकरे गटाची होती.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Trade Deal Ith America : "राष्ट्रीय हित हेच आमचं सर्वोच्च" ; अमेरिकासोबत व्यापार कराराबाबत पीयूष गोयल यांचे स्पष्टविचार

Chhatrapati Sambhajinagar : विठ्ठल-रुक्मिणीच्या पदस्पर्शाने पावन झालेले 'छोटे पंढरपूर'; वाळूजजवळील भाविकांचे श्रद्धास्थान

Pratap Sarnaik : 'अमराठींसाठी मोफत मराठी शिकवणी', मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...