राजकारण

उध्दव ठाकरेंच्या मशालीचा 'विजयी' प्रकाश! ऋतुजा लटकेंचा विजय

सत्तांतरानंतर आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : सत्तांतरानंतर आज पहिल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. यामध्ये शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके प्रचंड मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. यामुळे शिवसेनेची विजयी मशाल पेटली असून राज्यभरात शिवसैनिकांकडून जल्लोष सुरु आहे.

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुंदवली येथील शाळेमध्ये मतमोजणी सुरु होती. या निवडणुकीसाठी 81 हजार मतदारांनी मतदान केले होते. या निवडणुकीत पहिल्या फेरीपासून ऋतुजा लटकेंनी आघाडी घेतली आहे. यामुळे लटकेंचा विजय जवळपास निश्चित मानण्यात येत होता. मतमोजणीअखेर ऋतुजा लटकेंनी एकूण ६६ हजार २४७ मतं मिळवली. नोटाला १२ हजार ७७८ मतं मिळाली आणि १ हजार ५६९ मतांसह राजेश त्रिपाठी तिसऱ्या स्थानावर राहिले.

दरम्यान, अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून मुरजी पटेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या पोटनिवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. निवडणूक लढवण्यासाठी ऋतुजा लटके यांना कोर्टाची पायरी चढावी लागली होती. कोर्टाच्या आदेशानंतर त्यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला होता. भाजप व शिवसेनेकडून (ठाकरे गट) मोठ्या शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज भरण्यात आला. परंतु, राज ठाकरे व शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक व शरद पवार यांनीही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी केली होती. यानंतर भाजपने निवडणुकीतून माघार घेतली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sushil Kedia Post For Raj Thackeray : 'मी मराठी शिकणार नाही...' सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना पोस्ट करत डिवचलं

Ashadhi Wari 2025 : आषाढी एकादशीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान