राजकारण

'भाकरी खायची मातोश्रीची, अन चाकरी करायची सिल्व्हर ओकची'; कोणी केली राऊतांवर टीका?

भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांचा संजय राऊतांना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शिंदे गट-भाजपवर सातत्याने टीकास्त्र सोडत आहेत. केंद्राकडून फडणवीस यांच्यावर गद्दारांची कार चालवण्याची जबाबदारी, मला त्यांची कीव येते, अशा शब्दात राऊतांनी टीका केली होती. यावर भाजप नेते श्रीकांत भारतीय यांनी प्रतिक्रिया देताना जोरदार टोलेबाजी केली आहे. भाकरी खायची मातोश्रीची, अन चाकरी करायची सिल्व्हर ओकची, असा टोला भारतीय यांनी राऊतांना लगावला आहे.

काय म्हणाले श्रीकांत भारतीय?

सभेत संजय राऊतांवर कोण बोलेल? संजय राऊतांचा जो स्तर आहे. त्या स्तरात आम्हाला बसायचं नाही. मी सभेतही संजय राऊत यांच्यावर काही बोललो का, असा उलटप्रश्न श्रीकांत भारतीयांनी विचारला आहे. कोंबड्या-बिंबड्या हे सर्व राऊतांना शोभतं. एक युवक गाडीजवळ म्हणाला की, भाकरी खायची मातोश्रीची अन राखणदारी करायची सिल्व्हर ओकची. त्या तरुणाला मी थांबवलं, अशा निशाणा त्यांनी राऊतांवर साधला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ashadhi Wari 2025 : आषाढीचा उपवास कधी सोडावा जाणून घ्या...

Ashadhi Ekadashi 2025 : आषाढी एकादशी वारीसाठी एसटी महामंडळाकडून विशेष गाड्यांची सुविधा; जाणून घ्या

Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात पावसाचा तांडव ; ढगफुटीमुळे 69 मृत्यू, 400 कोटींचं नुकसान

Amit Shah Pune : "बाजीराव पेशवेंनी 40 वर्षाच्या आयुष्यात..." पुण्यात शाहांकडून पेशवांच्या शौर्यावर भाष्य