राजकारण

श्रीकांत शिंदे बसले मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर? राष्ट्रवादीकडून 'तो' फोटो ट्विट

राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकनाथ शिंदेंवर साधला निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. अशातच त्यांच्या गैरहजेरीत एकनाथ शिंदेंचे सुपुत्र श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत विराजमान झाल्याचे दिसत आहेत. यावरुन आता विरोधकांनी जोरदार टीका करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी ट्विटवर हा फोटो अपलोड केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे बसलेले दिसत आहेत. मात्र, शिंदे गटाने हा आरोप फेटाळला आहे.

रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा हा फोटो शेअर करत एकनाथ शिंदेंवर जोरदार टीका केली आहे. खा. श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूय. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर, असे सवाल वरपे यांनी शिंदेंना विचारला आहे.

तर, पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे यांनी या फोटोवरुन एकनाथ शिंदेवर टीकास्त्र सोडले आहे. मिंधे गटाचे खरे मुख्यमंत्री कोण?, असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांकडून कोणी माईक हिसकावून घेतेय. तर, कोणी यांची खुर्ची हिसकावतय. बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्रीच्या खुर्चीवर जाऊन बसणे म्हणजे याला हावरे पणाची घराणेशाही बोलतात. निदान त्या खुर्चीचा तरी योग्य सन्मान करावा, असा घणाघात त्यांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Nilesh Sable : "...कलाकारांना बोलावलं नाही!" – निलेश साबळेचा 'चला हवा येऊ द्या'बाबत खुलासा

Panchayat actor Asif Khan : "आयुष्यात काहीही होऊ शकतं..." – 'पंचायत' फेम आसिफ खानला हार्ट अटॅक; शेअर केली भावनिक पोस्ट

Nitin Gadkari : "महाराष्ट्राच्या राजकारणात ब्राह्मणांना किंमत नाही..." केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वक्तव्य चर्चेत

Uddhav Thackeray On Raj Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या स्फोटक मुलाखतीत राज ठाकरेंबद्दल महत्त्वाचे संकेत!