राजकारण

गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ; अमित ठाकरेंचं मोठ विधान

उल्हासनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना Amit Thackeray यांनी केले वक्तव्य

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे सरकारच्या (Shinde Government) मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा आता सुरू आहे. त्यात नेमकं कुणाला मंत्रिपद मिळणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. यासाठी अनेक नेत्यांनी शक्तीप्रदर्शन करत फिल्डींग लावली आहे. त्यातच मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी गृहमंत्री पद दिल्यास सत्तेत सहभागी होऊ, असे मोठे विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळातून आता चर्चांना उधाण आले आहे.

अंबरनाथ बदलापूर त्यानंतर उल्हासनगरमध्ये अमित ठाकरे यांचा महासंपर्क दौऱ्याचे टाऊन हॉलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अमित ठाकरे यांनी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा समस्या जाणून घेतल्या आणि लवकरच मनविसे कार्य करणे संघटना स्थापन करणार असून त्यावर लवकरच विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होणार आहेत. त्यानंतर ऑफ द रेकॉर्ड त्यांना एका पत्रकारांनी तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का, दोन मंत्री पद मनसेला देणार आहेत यावर आपलं काय मत आहे, असे विचारले.

यावर अमित ठाकरे यांनी हसून मस्करीत उत्तर देत मला मंत्रीपद नको ती अफवा आहे. मात्र, आम्हाला जर गृहमंत्री पद मिळाले तर शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू, असे सूतोवाच केले आहे. मात्र, याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.

दरम्यान, राज्यात सत्तांतर घडत असताना मनसेच्या एकमेव आमदाराने शिंदे-फडणवीस सरकारच्या बाजूने विधानसभेत मतदान केले होते. तेव्हापासून मनसे राज्याच्या मंत्रिमंडळात समाविष्ट होईल अशी चर्चा सुरू झाली. मनसेला २ मंत्री पदे दिली जातील असे बोलले गेले. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अमित ठाकरे यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी आग्रही आहेत अशी चर्चा सुरू होती. परंतु, राज ठाकरेंनी ही बातमी अफवा असल्याचे म्हंटले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा