राजकारण

Sujay Vikhe-Patil On Uddhav Thackeray : सत्ता अन् मतांसाठी उद्धव ठाकरे लाचार

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेनंतर अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता भाजप खासदार सुजय विखे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. 'इंडिया' हे नाव ठेवण्यास मान्यता मिळणार नसून पंतप्रधान मोदी म्हणाले तसे 'ईस्ट इंडिया' कंपनी आणि 'इंडियन मुजाहिदीन' नावामध्येही 'इंडिया' आहे. मात्र त्यांनी देशाचे नुकसानच केले आहे. विरोधक एकत्र राहावेत म्हणून एकत्र केलेला हा एक 'फंडा' असून त्याला कसलाही 'अजेंडा' नाही.

स्व. बाळासाहेबांचे विचार सोडून ठाकरेंना अनेकदा तडजोड केलेली आहे. त्यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांची विश्वासहर्ता गमावल्यानेच एकनाथ शिंदे त्यांना सोडून गेले आणि मुख्यमंत्री झाले. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी हिंदी भाषिक मतदार मोठ्या संख्येने असल्याने त्यावर डोळा ठेवला जात आहे. सत्ता आणि मतांच्या लाचारी पत्करल्याचे उद्धव ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वीच दाखवून दिलेले आहे. असे विखे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा