राजकारण

Sushilkumar Shinde : माझा दोन वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपामध्ये या म्हणतात

माझा दोन वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपामध्ये या म्हणतात असं मोठं वक्तव्य काँग्रेसचं नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

माझा दोन वेळा पराभव झाला असताना प्रणिती आणि मला भाजपामध्ये या म्हणतात असं मोठं वक्तव्य काँग्रेसचं नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केलं आहे. अक्कलकोटमधील एका कार्यक्रमामध्ये यांनी हे मोठं विधान केलं आहे.

अक्कलकोट तालुक्यातील बोरोटी येथे झालेल्या हूरडा पार्टी दरम्यान कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेस आमच्या रक्तात आहे. आम्ही कधीही काँग्रेस सोडून जाणार नाही. असे स्पष्टीकरण सुशीलकुमार शिंदे यांनी दिलं आहे.

माझा दोन वेळा पराभव झालेला असताना प्रणिती किंवा मला भाजपमध्ये या म्हणतात. पण आता ते कसे शक्य आहे. ज्या आईच्या कुशीत आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारुण्य गेलं. आता मी 83 वर्षाचा आहे. तुम्हाला माहिती आहे प्रणिती पक्षीय बदलाच्या भानगडीत पडणार नाही. राजकारणामध्ये असे होतं राहतं. असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा