राजकारण

मुख्यमंत्र्यांची भूमिका गुळाच्या गणपतीसारखी; सुषमा अंधारेंचा टोला

सुषमा अंधारे यांनी केले शिंदे - फडणवीस सरकारला लक्ष्य

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका गुळाचा गणपतीसारखी झाली असल्याची गंभीर टिका शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. शिवसेनेच्या वतीने लातूर शहरात पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच दिवसापासून शिंदे गटोविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आजही त्यांनी शिंदे - फडणवीस सरकारला लक्ष्य केले. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी साथीचे रोग कळत नाही. आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना हेक्टर आणि एकर यांच्या मधला फरक कळत नाही, अशांना मंत्री करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका गुळाचा गणपतीसारखे झाल्याची टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.

दरम्यान, तुमच्या गटातील आमदारांना 50 खोक्यांची ऑफर दिली हे सत्य आहे. तुमच्या अनेक ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाल्या आहेत. तुम्हाला या सगळ्यांना उत्तर द्यायचे होते तर त्याचदिवशी का नाही दिले, असा सवाल सुषमा अंधारे यांनी धक्काबुक्की करणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांना केला आहे. तर, भाजपाची आंदोलने ही इव्हेंट असतात. भाजपा असे अनेक पॉलिटिकल इव्हेंट अधूनमधून करत असते, अशी टीकाही त्यांनी भाजपवर केली होती.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा