राजकारण

Kirit Somaiya Video: वस्त्रहरण करणाऱ्यांचं वस्त्रहरण झालंय; सुषमा अंधारेंचा घणाघात

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओची बातमी प्रसारित होताच संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. तर, राज्यभरात सोमय्यांविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओची बातमी प्रसारित होताच संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. तर, राज्यभरात सोमय्यांविरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमय्यांवर टीकास्त्र सोडले आहे. अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्यांच वस्त्रहरण झालंय, अशी टीका त्यांनी केली आहे.

चांगली चर्चा करावी असा हा व्हिडीओ नाही. ते प्रत्येक व्यक्तीबद्दल काय बोललं का केलं याचा परिणाम होतो. अनेकांचे वस्त्रहरण करणाऱ्यांच वस्त्रहरण झालं. ४० महिलांची फसवणूक करण्यात आली आहे, ईडी, सीबीआय चौकशी लावण्याच्या धमकी देत अधिकाऱ्यांच्या घरातील महिलांचेच शोषण करण्यात आलंय. ३०-३५ व्हिडीओ तीन-साडेतीन तासांचे आहे. भाजप पद देतो, घटस्फोट करून देतो अस सांगून फसवणूक केली आहे. महिलांची गोपनीयता ठेवली पाहिजे. किरीट सोमय्या यांनी केलं ते वाईटच, असे सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

भाजपने अनेक गोष्टी लपवल्या, जिरवल्या. भाजपनेच हा व्हिडीओ व्हायरल केलं आहे. अनेक अस्वच्छ लोक घेतले त्याच्यावर आरोप करणारा माणूसच अस्वच्छ आहे. गृहमंत्री कारवाई करतील का असा प्रश्न आहे? याअगोदर त्यांच्याकडे अनेक जणांवर कारवाई करण्याची मागणी केली पण त्यांनी केली का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. किरीटची भाजपबाबत उपयुक्तता संपली आहे. भाजपला त्यांना डॅमेज करून सोडून द्यायचा आहे, अशी टीकाही अंधारेंनी केली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 : ब्रोंको टेस्ट पास करा तरचं संघात चान्स! BCCI चा नवा नियम; ब्रोंको टेस्ट म्हणजे काय? Bronco Test

Rohit Pawar : शिखर बँक घोटाळाप्रकरणी आमदार रोहित पवारांची जातमुचलक्यावर सुटका

Raigad Boat Accident : रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, बचावकार्य युद्धपातळीवर

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली