राजकारण

शिंदेंची मोठी खेळी! सुषमा अंधारेंचे पती शिंदे गटात करणार प्रवेश

शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर जोरदार आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच शिवसेना नेत्या सुषमा अंधारे शिंदे गटावर सातत्याने हल्लाबोल करताना दिसतात. परंतु, आता अंधारे कुटुंबात फूट पडली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता शिंदे गटात प्रवेश करणार आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

सुषमा अंधारेंचे पती अ‍ॅड. वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात आज प्रवेश करणार आहेत. ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद मठात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. ठाकरे गटासाठी हा धक्का मानण्यात येत असून राजकीय मैदानात आता पती-पत्नी आमने-सामने पाहायला मिळणार आहे.

याबद्दल बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले, आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, शिवसेनेत फूट पडल्यानंतर सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केला होता. तेव्हापासून त्यांनी सातत्याने शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला होता. महाप्रबोधन यात्रेनिमित्ताने त्यांनी शिंदे गटांच्या आमदार आणि मंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन टीकास्त्र सोडले. त्यांना अडवण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी करत त्यांचे पती वैजनाथ वाघमारे यांना सामील केली असल्याची चर्चा आहे. परंतु, शिंदे गटाची ही खेळी यशस्वी होणार का, सुषमा अंधारे यांची तोफ थंड पडणार की अधिक आक्रमक होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणूक होणार सुरू…

Nashik Ganesh Visarjan : राज्यात गणेश विसर्जनाचा उत्साह; गिरीश महाजानांनी ढोल वाजवत लुटला आनंद

Lalbaugcha Raja Donation 2025: लालबागच्या गणरायाला अमिताभ बच्चन यांचं दान; सोशल मीडियावर नाराजीची लाट

Lunar Eclipse 2025 : भारतात ७ सप्टेंबरला दिसणार खग्रास चंद्रग्रहण