राजकारण

शिंदे सरकारला धक्का: टाटा-एअरबसचा 22 हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला

दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : दीड लाख कोटी रुपयांचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर अवघ्या दीड महिन्याच आणखी एक मोठा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला आहे. एअरबस-टाटा हवाई दलासाठी विमान निर्मितीचा २२ हजार कोटींचा प्रकल्पही गुजरातला मिळाला आहे. यावरुन विरोधकांनी आता शिंदे-फडणवीसांवर टीकेची झोड उठवली आहे.

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यांनतर महाराष्ट्राला तेवढाच मोठा प्रकल्प उभारण्यास केंद्र सरकार मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. तर, एअरबस आणि टाटा यांचा प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हंटले होते. परंतु, एअरबस- टाटा प्रकल्प गुजरातमध्ये उभारण्याची घोषणा या कंपनीने केली. यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र, हजारो नोकऱ्यांचे आश्वासन देणारा हा प्रकल्प गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी चालना देणारा ठरणार आहे.

महाराष्ट्र विमानतळ विकास महामंडळाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले की, तीन वर्षांपूर्वी टाटा अधिकाऱ्यांच्या एका विभागाने नागपूरमधील मिहान येथे होणार होता. महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांनी यांनी हा प्रकल्प राज्यात उभारण्यासाठी प्रयत्न केले होते. ते तीन ते चार वेळा आमच्या कार्यालयात आले. त्यानंतर, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यांच्याकडून जमिनीच्या मागणीवर कोणताही संवाद झाला नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या उपस्थितीत ३० ऑक्टोबर रोजी वडोदरा येथे आयएएफसाठी वाहतूक विमान निर्मिती प्रकल्पाची पायाभरणी करतील, असे संरक्षण सचिव अजय कुमार यांनी सांगितले.

काय आहे प्रकल्प?

सी-२९५ विमानांचा पहिला ताफ्यातील १६ विमाने सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या काळात मिळणार आहे. उर्वरित ४० विमाने ही टाटा अ‍ॅडव्हान्स सिस्टीम्स या कंपनीच्या भागीदारीतून भारतात तयार केली जातील. भारतात बनलेले पहिले विमान सप्टेंबर २०२६मध्ये वायूदलाच्या ताफ्यात येईल. युरोपच्या बाहेर सी-२९५चे उत्पादन होण्याची देखील ही पहिलीच वेळ आहे. अशा 40 विमानांची निर्मिती टाटा ऍडव्हान्स सिस्टीम करणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : रायगडच्या उरणजवळ समुद्रात बोट बुडाली

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू