शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर (Tejasvee Ghosalkar ) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिला आहे. स्थानिक नेतृत्वावर नाराज होऊन तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती मिळत आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी व्हॉट्सअॅपद्वारे विभागप्रमुखांकडे राजीनामा सादर केला असून यातच तेजस्वी घोसाळकर या भाजपमध्ये किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यातच तेजस्वी घोसाळकर यांनी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी त्यांना भेटायला बोलावले. या भेटीनंतर घोसाळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेजस्वी घोसाळकर म्हणाले की, उद्धव साहेबांची मी भेट घेतली. आमचं बोलणं झालेलं आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत. काही प्रश्न, समस्या अजून आहेतच. अपेक्षा करते की, लवकरात लवकर ते उत्तर देतील. त्याच्यावरुन ठरवेन की, काय निर्णय घ्यायचा आहे. असे त्या म्हणाल्या.