राजकारण

Telangana Election Results 2023 : तेलंगणात काँग्रेसने कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल येण्याआधीच एक्झिट पोलने सर्वांच लक्ष वेधलं आहे. 2 वेळा संधी दिल्यानंतर तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी आंदोलन आणि उपोषण करणाऱ्या चंद्रशेखर राव यांच्या विरोधात बदलाचे वारे वाहत आहेत, असं एक्झिट पोल वरून दिसतंय. 119 पैकी 60 जागा सत्ता स्थापनेसाठी आवश्यक आहेत. मात्र एक्झिट पोलनुसार बीआरएस, काँग्रेस आणि भाजप यांच्या खात्यात ज्या जागा जातांना दिसतायेत त्यानुसार तेलगंणात मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी जोरदार रस्सीखेच होणार आहे.

तेलंगणात काँग्रेसचा शंभर टक्के विजय होईल, असे बऱ्याच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले होते. तसं न झाल्यास महत्वाचा फॅक्टर ठरणार आहे तो म्हणजे एमआयएम. 7 आमदार असलेली एमआयएम यावेळी 9 जागा लढवत आहे. एक्झिट पोलनुसार निकाल लागले तर, कोणत्याचं पक्षाला बहुमत मिळणार नाही अशी परिस्थितीत सत्ता स्थापनेचा आकडा गाठण्यासाठी इतर पक्षाची मदत घ्यावी लागेल. भाजप किंवा काँग्रेसला एमआयएम साथ देणं अशक्य आहे. बीआरएस आणि एमआयएम यांच्या पडद्यामागून सामंजस्य असल्याचे तेलंगणाच्या राजकारणात बोलले जाते. बीआरएस काठावर पास झाली तरी एमआयएमबरोबर असल्यास सत्ताबदलाच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस आणि भाजपचा खेळ बिघडू शकतो.

मुख्यमंत्री केसीआर यावेळी 2 जागांवरून निवडणूक लढत आहेत. यावरूनच केसीआर यांना निकालांबद्दल शंका असल्याचं स्पष्ट होतंय. कामारेड्डी बरोबर सिद्दीपेट जिल्ह्यातील गजवेलमधूनही मैदानात उतरलेल्या केसीआर यांना जनमताचा अंदाज आल्यानेच त्यांनी 2 जागा लढवण्याचा निर्णय घेतलेला असू शकतो. तेलंगणाच्या स्थापनेपासून दोन्ही टर्म मुख्यमंत्रिपदी राहून आणि रयतूबंधू, दलितबंधू या योजना लोकप्रिय असूनही राव यांना यशाची धाकधूक वाटत आहे. काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली आहे. बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे. तर बीआरएस 33 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम 6 जागांवर आघाडीवर आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा