राजकारण

ठाकरे सरकार अल्पमतात, शिंदेंचे पत्रावर 55 पैकी 34 आमदारांच्या सह्या

एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रात शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत. यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Crisis : आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना कोणाची यावरुन वाद होण्याची चिन्ह आहेत. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या या टि्वटनंतर त्यांनी पाठवलेल्या पत्रानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहले. या पत्रात 34 आमदारांच्या सह्या आहेत. म्हणजेच शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या आहेत. यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर ठाकरे सरकारकडे नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.

एकनाथ शिंदे यांनी विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ यांना नवं पत्र पाठवत सुनील प्रभू यांच्या नियुक्तील आव्हान दिलंय. सुनील प्रभू यांचा आदेश अवैध असून प्रतोदपदी भारत गोगावली यांची नियुक्ती केल्याचं शिंदे यांनी पत्रात जाहीर केले आहे. या पत्रात तब्बल 34 आमदारांच्या सह्या आहेत. सात पानांच्या या पत्रात 2019 च्या निवडणुकीत भाजप सोबत युती केली. परंतु सरकार विरोधकांसोबत बनवले. त्यासाठी वेळोवेळी तत्वांशी तडजोड केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pappu Yadav Challenges Raj Thackeray : "ही गुंडगिरी थांबवली नाही तर..."; पप्पू यादवची राज ठाकरेंना धमकी

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता