Omraje Nimbalkar Team Lokshahi
राजकारण

'तू तुझ्या औकातीत राहा' ठाकरे गट खासदार भाजप आमदारावर संतापले

'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं.

Published by : Sagar Pradhan

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आज पिकविम्याच्या संदर्भात स्थानिक प्रतिनिधींची बैठक पार पडली. मात्र, यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. 'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं.

काय घडलं नेमकं?

प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. पण त्याचवेळी, प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का करताय? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी केला. याचवेळी ओम राजे निंबाळकर यांना उत्तर देताना राणा पाटील यांनी त्यांचा 'बाळा' असा उल्लेख केला.पण संतापलेल्या ओमराजे यांनी 'तू तुझ्या औकातीत राहा, तुझी आणि तुझ्या खानदानाची औकात आणि संस्कार सर्वांनाच माहीत आहेत,' असं म्हणत राणा पाटील यांच्यावर आगपाखड केली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा