Uddhav Thackeray | Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

'ठाकरेंचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर' शिंदे गटाच्या जोरदार युक्तिवाद

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत.

Published by : Sagar Pradhan

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट निर्माण झाले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असा दावा करण्यात आला. यावरच आता शिवसेना निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणाचा याबाबतची सुनावणी आजपासून निवडणूक आयोगासमोर सुरू झाली आहे. यावेळी सुनावणीत दोन्ही गटाकडून जोरदार युतीवाद करण्यात आला. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी या सुनावणीवेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना पक्षप्रमुख पदावर राहण्याचा अधिकार नाही, असा युक्तीवाद केला.

शिवसेना पक्षप्रमुख पदी उद्धव ठाकरे यांची करण्यात आलेली निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी केला. शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला.

शिंदे गटाचे वकील अॅड. महेश जेठमलानी यांनी म्हटले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर घेण्यात आलेले निर्णय, संघटनात्मक बदल हे बेकायदेशीर आहेत. शिवसेनेची जुनी घटना ही बाळासाहेब ठाकरे केंद्रीत होती. शिवसेनेच्या घटनेत कोणताही बदल न करता पक्षप्रमुख म्हणून पद निर्मिती करण्यात आली असल्याचा दावा शिंदे गटाने केला. पक्षप्रमुख म्हणून राहण्याचा अधिकार ठाकरेंकडे नसल्याचा दावा शिंदे गटाने केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Atal Setu : अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर