राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मुद्यांवर चर्चा झाली.
आजच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. इंडिया आघाडीच्या पहिल्या जाहीर सभेसाठी भोपाळची निवड करण्यात आली आहे. भोपाळमध्ये ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सभा घेतली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला. अशी माहिती के.सी. वेणुगोपाल यांनी दिली.