दिवाळीच्या पाश्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदा आपली दिवाळी जम्मू-काश्मीरमध्ये सीमेच्या सुरक्षेवर असलेल्या जवानांसोबत साजरी करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे दिवाळीला जम्मूतील राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरला जाणार आहेत. तसेच भारतीय लष्कराचे प्रमुख एम. एम. नरवणे सुद्धा जम्मूच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी आघाडीच्या चौक्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधला आहे.
यंदाची दिवाळी सण पंतप्रधान नरेंद्र मोदी नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या नौशेरा ब्रिगेडला जाणार आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे राजौरीत नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे मनोधैर्य उंचावले आहेत. अशी माहीत सूत्रांनी दिली आहे. भारतीय लष्कराने राजौरीला लागून असलेल्या पूंछ जिल्ह्यातील बाटाधुलियन जंगलात दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई सुरू केली होती. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे ९ जवान शहीद झाले. हा परिसर दहशतवादमुक्त करण्यासाठी लष्कराचे जवान लढत आहेत. दरम्यान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.