राजकारण

CM Eknath Shinde: दीघे साहेब जर माझ्या आयुष्यात नसते तर..., एकनाथ शिंदे म्हणाले...

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. 'योध्दा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे' असे पुस्तकाचे नाव आहे.

Published by : Dhanshree Shintre

ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील पुस्तकाचं प्रकाशन सोहळा पार पडला. 'योध्दा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे' असे पुस्तकाचे नाव आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशन झाले. कार्यक्रमस्थळी अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. दादा भुसे, शंभूराजे देसाई, प्रताप सरनाईक या कार्यक्रम ठिकाणी पोहोचले होते.

मी मुख्यमंत्री व्हायच्या आधीच ढवळ सर पुस्तक प्रकाशन करायचं सांगितलं होतं, मी त्यांना होकार दिला होता. माझ्या सारख्या कार्यकर्त्याला नाही म्हणावलं नाही, मी अनेक पुस्तकं प्रकाशन केली, माझ्यासाठी हाही क्षण आनंदाचा आहे, माझ्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशन होतंय, त्यामुळे हा क्षण थोडा वेगळा आहे, माझे भाषण करणे देखील अवघडून टाकणारे आहे. मी जे कार्य केले त्याचे उद्दतिकरण करणारे वाटतं नाही, माझा सुरुवातीपासून यासाठी नकार होता, मात्र एव्हढे सर्व मंडळी आली, माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची तुमची साथ नसती तर एकनाथ इथवर पोहोचला नसता.

"जबतक हे आम जनता का साथ, तबतक काम करेगा एकनाथ". "चाहे जितने रस्ते मे आये कांकर, लेकीन आपके जैसे पीछे शंकर". माझ्या कार्यकर्त्यांनी माझी साथ दिली, 100% निष्ठा आणि दोनशे टक्के विश्वास ठेवला. माझा प्रवास खडतर होता, मिळेल ते काम केले, वेळेला रिक्षाही चालवली. मला काहीतरी मिळेल यासाठी काम करणे नाही तर मी काम केल्याने समाजाला काय मिळेल यासाठी काम केले. कार्यकर्ता या पदापेक्षा मला मोठे वाटतं, माझ्यासाठी CM म्हणजे कॉमन मॅन, पुढच्या आवृत्तीत बदल करा, मात्र दादांना देखील सोबत घ्या.

हे जे काही आहे, तो क्लायमॅक्स नाही, इंटरवल नाही हा ट्रेलर आहे. योद्धा, कर्मयोगी, यापेक्षा कार्यकर्ता असता तर मला जास्त आनंद झाला असता. दीघे साहेब जर माझ्या आयुष्यात नसते तर मी आज समोर उभा नसतो. आधी ठाणे आणि पालघर एकत्र होता, तेव्हा दिघे साहेब सर्व फिरायचे, शेवटची ट्रेनने यायचे आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी पहिल्या ट्रेनने जायचे. मी कितीही थकलो, कितीही काम केले, आणि हा रुद्रांश भेटला की सर्व थकवा जातो, हे टॉनिक आहे माझे असं एकनाथ शिंदे पुस्तक प्रकाशनच्या वेळी म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली