देशातील प्रमुख विरोधी पक्षांचे नेते मुंबईत आले आहेत. ग्रँड हयातमध्ये या सर्वांची बैठक पार पडली. 28 पक्षांचे नेते या बैठकीसाठी मुंबईत जमले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडी लोगोची घोषणा करण्यात येणार होते. मात्र आता या लोगोचे अनावरण पुढे ढकलण्यात आले आहे. सर्वांचे मत लक्षात घेऊन निर्णय होणार असल्याची माहिती मिळते आहे. कमिटी स्थापन झाल्यावर लोगोचं अनावरण होणार.
काल काही नेते उशिरा पोहोचल्यामुळे सगळ्यांशी याबाबत मंथन झालेलं नाही. या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आघाडीतील प्रमुख पक्ष्यांच्या 11 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत, हे लोगो पक्ष आणि समितीसमोर ठेवले जाणार आहे. समिती स्थापन झाल्यानंतर त्या समितीत लोगोवर चर्चा होऊन लोगोचं अनावरण करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.