Ajay Shinde | Eknath Shinde Team Lokshahi
राजकारण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये गुप्त खलबते

मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरणार

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अमोल धर्माधिकारी | पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष अजय शिंदे यांच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या पुणे दौऱ्यादरम्यान गुप्त खलबते झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

अजय शिंदे यांनी कसबा विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडणूक लढवली आहे, यामुळे या गुप्त बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हेदेखील यापूर्वी मनसेकडून कसब्यामध्ये लढले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यामधील ही गुप्त बैठक राजकीय वर्तुळात भुवया उंचवणारी ठरणार आहे.

त्याचप्रमाणे मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी हिंदुत्व आणि विकास या मुद्द्याला भारतीय जनता पक्ष शिवसेना युतीच पुढे घेऊन जात आहे आणि म्हणूनच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा दिला आहे. मात्र, तरीही मनसे कार्यकर्ते आतून धंगेकर यांचेच काम करीत असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री शिंदे आणि अजय शिंदे यांच्या गुप्त बैठकीमुळे धंगेकर यांना मनसेकडून मिळणारी छुपी रसद देखील बंद होईल, अशी चर्चा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा