थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Eknath Shinde) महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अनेक बैठकांचे आयोजन करण्यात येत आहेत. यातच महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
यातच आता विशेष म्हणजे एकनाथ शिंदे महापालिका निवडणुकीनंतर भाकरी फिरवणार असल्याची माहिती मिळत असून पालिका निवडणुकीनंतर काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
तसेच पक्षातील काही महत्त्वाचे पदाधिकारी देखील बदलण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली आहे. आता महापालिका निवडणुकीनंतर मंत्रिमंडळात कोणत्या नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलं असून मुंबई पुणेसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकीची घोषणा करण्यात आली. येत्या 15 जानेवारी 2026 रोजी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असून 2869 जांगासाठी ही निवडणूक होणार आहे.
Summery
महानगरपालिका निवडणुकीनंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल
पालिका निवडणुकीनंतर फेरबदल करणार असल्याची माहिती
महापालिका निवडणुकीनंतर काही नवीन चेहरे मंत्रिमंडळात येण्याची शक्यता