(NCP Vardhapan Din) आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन आहे. यातच दोन्ही राष्ट्रवादी काका-पुतणे एकत्र येणार का? याची देखील जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26वा वर्धापन दिन असून काल अजित पवार आणि शरद पवार हे पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे होणाऱ्या एका कार्यक्रमासाठी एकाच मंचावर आले होते. त्यामुळे चर्चांना आणखी उधाण आले.
आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीकडून वेगवेगळा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. पुण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वर्धापन दिनानिमित्त बालेवाडी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे.
यासोबतच शरद पवार यांचा बालगंधर्व रंगमंदिर येथे सकाळी 11 वाजता वर्धापन दिवसाचा मुख्य कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या दोन्ही वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून शरद पवार आणि अजित पवार काय बोलणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.