Raj Thackeray Team Lokshahi
राजकारण

आज शिवतीर्थावर मनसे नेत्यांना मिळणार 'राज'आज्ञा

साडेदहा वाजता मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

Published by : Vikrant Shinde

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसे गुढीपाडवा (MNS Gudhi Padwa Melawa) मेळाव्यानंतर हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळते आहे. मनसेच्या ह्या मुद्द्यामूळे अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणातील चर्चेपासून दूर राहिलेली मनसे आता पुन्हा एकदा चर्चेत येत आहे. मनसेने उभा केलेला भोंग्यांचा मुद्दा हा राज्याच्या राजकारणातील सर्वांत चर्चेचा विषय आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

राज ठाकरे पुन्हा आक्रमकरीत्या सक्रीय:

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) ह्यांनी गुढी पाडवा मेळावा, ठाण्यातील जाहीर सभा व त्यानंतर पुण्यातील महाआरती ह्या तीनही ठिकाणी प्रखर हिंदूत्ववादी भुमिका मांडल्याने ते पून्हा एकदा आक्रमक राजकारणाकडे वळत आहेत हे पाहायला मिळत आहे. त्यातच पुण्यामध्ये घेतलेल्या पत्रकार परीषदेमध्ये त्यांनी 5 जूनला अयाध्येला जाणार असल्याची घोषणा केली.

हे असू शकतात आजच्या बैठकीतील मुद्दे:

  • 5 जून रोजी होणाऱ्या अयोध्या दौऱ्याविषयी चर्चा व नियोजन

  • भोंग्याच्या वादावर चर्चा

  • आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची आखणी

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा