उद्योग मंत्री उदय सावंत आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. खासदार उदयनराजे भोसले आणि बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निवासस्थानी भेट झाल्यानंतर उदय सामंत पुण्यातील गर्भवती महिलेच्या संदर्भात बोलताना म्हणाले की, "यासंदर्भात कडक कारवाई केली जाईल. पुढे असे प्रकार होऊ नयेसाठी देखील दखल घेतली आहे. कारवाई करण्यासंदर्भात तिन्ही नेत्यांनी गांभीर्याने विषय घेतला आहे आणि योग्य ती कारवाई होईल". तसेच मराठी भाषा आणि वक्फ बोर्डवर काही मुद्दे मांडले आहेत.
मराठी भाषेवरुन उदय सामंत संतापले
"महाराष्ट्र मध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक राहत असतात. सर्व भाषेचा वापर करणारे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आदर सगळ्यांनाच आहे, मात्र महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचं वेडं वाकडे विद्रुपीकरण जर कुणी करत असेल तर हे कधीही खपवून घेतले जाणार नाही. त्याबद्दल धोरणात्मक निर्णय आम्ही घेणार आहोत. त्यासंदर्भात माझी मुख्यमंत्र्यांच्या आदेशावर पोलिस विभागासोबत बैठक होणार आहे. महाराष्ट्रात राहूव मराठीचा अपमान करु नये, पण अशात कायदा देखील हातात घेऊ नये ही भूमिका आहे. तसेच औद्योगिक क्षेत्र असेल मराठी भाषे संदर्भात कशाप्रकारे पुढे गेलं पाहिजे यासंदर्भात धोरण आम्ही घोषित करु", असं उदय सामंत म्हणाले.
वक्त बोर्डवरुन उदय सामंत यांचा रोख उद्धव ठाकरेंवर
वक्त बोर्डाच्या निर्णयावर सध्या काय प्लस-माइनस झालं आहे, हे सगळ्यांनी पाहिलं आहे. कोण काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलं, पूर्वीपासून हिंदुत्व जपणारे यांनी काय केलं? अशी टीका उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता, उद्योग मंत्री उदय सावंत यांनी वक्त बोर्डाच्या विषयावर केली