राजकारण

Uday Samant's Car Attacked : पोलिसांची मोठी कारवाई; रात्रभर शिवसैनिकांची धरपकड

शहर प्रमुखांसह अनेक शिवसैनिकांना भारती विद्यापीठ पोलिसांनी घेतले ताब्यात

Published by : Team Lokshahi

अमोल धर्माधिकारी | पुणे : बंडखोर आमदार आणि आक्रमक शिवसैनिक यांच्यातला संघर्ष वाद शिगेला पोहोचला आहे. पुण्यात बंडखोर आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलिसांनी रात्रभर अनेक शिवसैनिकांची धरपकड केली आहे. तर, पुणे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे (Sanjay More) यांनाही अटक करण्यात आली आहे.

पुण्यात उदय सामंत यांच्या गाडीवर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी मोठी कारवाई करत अनेक शिवसैनिकांची रात्रभर धरपकड केली. यात आदित्य ठाकरे यांच्या सभेच्या आयोजकासह अनेक शिवसैनिकांना भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

यामध्ये शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, संभाजीराव थोरवे, राजेश पळसकर,सुरज लोखंडे, चंदन साळुंखे, विशाल धनवडे. अनिकेत घुले, रुपेश पवार व इतर शिवसेना पदाधिकारी यांच्यावर भारती विद्यापीठ स्टेशनमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा पुणे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेवून कडक कारवाईचे दिले आहेत.

दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि बंडखोर नेते उदय सामंत काही क्षण एकमेकांसमोर आले. उदय सामंत कात्रज चौकात आले असता आदित्य ठाकरेंचा ताफाही त्याच चौकाकडे येत होता. त्यामुळे शिवसैनिकांनी प्रचंड मोठी गर्दी चौकात केली होती. यातील काही शिवसैनिकांनी उदय सामंतांची गाडी ओळखली व गद्दार गद्दार अशा घोषणा देत गाडीला घेराव घातला. पोलिसांनी गाडीला सुरक्षा देण्याचा प्रयत्न केला. मात्र आक्रमक शिवसैनिकांनी गाडीवर हल्ला केला. यात सामंत यांच्या गाडीची मागची काच फुटली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा