थोडक्यात
भाजपचा महायुतीतील घटक पक्षालाच धक्का
अजित पवारांच्या मंत्र्यासमोर लढलेल्यांचा आज भाजप प्रवेश
सिन्नरमधून उदय सांगळे दिंडोरीतुन सुनीता चारोस्कर यांचा आज भाजपात प्रवेश
( BJP ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. यातच आता भाजपचा महायुतीतील घटक पक्षालाच धक्का बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
सिन्नरमधून उदय सांगळे आणि दिंडोरीतून सुनीता चारोस्कर आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अजित पवारांच्या मंत्र्यासमोर लढलेल्यांचा आज भाजप प्रवेश होणार असल्याने आता राजकीय चर्चा रंगल्या आहेत. उदय सांगळे यांनी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
सुनीता चारोस्कर यांनी मंत्री नरहरी झिरवळांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीपूर्वी हा पक्षप्रवेश होत असल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.