Udayan Raje Bhosale Team Lokshahi
राजकारण

Udayanraje Bhosale: उदयनराजेंची संजय राऊतांना जाहीर कार्यक्रमात धमकी

Sanjay Raut यांना म्हणाले, श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन

Published by : Team Lokshahi

Satara : "कोण संजय राऊत हे मला माहीत नाही. त्यांच्यांबद्दल आम्ही वाईट बोलत नाही. परंतु, कोणी आमच्याबद्दल वाईट बोललं तर आम्ही बांगड्या भरल्या नाहीत. त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन, अशी धमकी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना जाहीर कार्यक्रमात दिली. उदयनराजे यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली.

कोल्हापूर येथील कार्यक्रम संपल्यानंतर संजय राऊत यांनी छत्रपती घराण्याबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. यावर त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, साताऱ्यात महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला बक्षीस देण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी संजय राऊत यांच्यावर चांगलीच आगपाखड केली.

काय म्हणाले उदयनराजे

"संजय राऊत यांना त्यांचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन. आमच्या स्वाभिमानाला छेडाल तर मी गप्प बसणार नाही, त्यांना बघायला वेळ लागणार नाही.

कोणत्याही कुटुंबातील असला तरी प्रत्येकाला स्वाभिमान असतो, यामुले स्वाभिमान छेडला तर आम्ही गप्प बसणार नाही.

महाराष्ट्र केसरीला बुलेट

महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याला उदयनराजे भोसले यांनी बक्षीस म्हणून बुलेट दिली. त्यांच्या हस्ते पृथ्वीराज पाटील याला बुलेट गाडी बक्षिस म्हणू देण्यात आली. पृथ्वीराज पाटील यांनी दिलेल्या बुलेटला उदयनराजे यांचा खास 007 हा नंबरही देण्यात आला.

राजकीय पडसाद उमटणार

'संजय राऊत यांना त्याचा श्वास कसा थांबवायचा हे मी दाखवून देईन' अशी धमकी उदयनराजे यांनी दिली. या धमकीचे पडसाद राजकीय पटलावर उमटणार आहेत. यावर संजय राऊत नेमकी काय भुमिका घेतात यावर उत्सुकता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर