BJP leader Kirit Somaiya held pc Shiv Sena and NCP leaders of corruption 
राजकारण

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींच्या भ्रष्टाचारात कनेक्शन; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Published by : Shweta Chavan-Zagade

ईडीने नवाब मलिक (nawab malik) यांना अटक केल्यानंतर प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या घरी पोहोचले आहेत. यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे. त्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पत्रकार परिषद घेत  शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) हे शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचाराची क्रोनोलॉजीच सादर केली. यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांच्या पत्नी यामिनी जाधव यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरला तेव्हा या सगळ्याची सुरुवात झाली. यामिनी जाधव यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात कोट्यवधींची संपत्ती दडवली होती. कोणत्याही उमेदवाराने प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर निवडणूक आयोगाने ती माहिती आयकर विभागाकडे पाठवली जाते. आयकर विभाग त्याची तपासणी करून त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला देतो. मी ६ जानेवारीला यासंदर्भात कंपनी मंत्रालय, ईडी आणि काही यंत्रणांची भेट घेतली होती. त्यानंतर १४ जानेवारीला मी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. आम्ही गेले अनेक दिवस या सगळ्याचा पाठपुरावा करत होतो.

तसेच  यावेळी उदयशंकर महावार हा हवाला ऑपरेटर हे सगळे आर्थिक व्यवहार करून देत होता. यशवंत जाधव यांनी शिवसेनेच्या नेत्यांना भ्रष्टाचार आणि बेनामी पैसे कसे वळवायचे याचा आदर्श घालून दिला होता. त्याच पद्धतीने ठाकरे कुटुंबीय आणि अनिल परब यांनी भ्रष्टाचार केला. या सगळ्यात उदयशंकर महावार या हवाला ऑपरेटरची महत्त्वाची भूमिका आहे. एवढेच नव्हे तर उदय महावार हा ठाकरे आणि गांधी या दोन्ही परिवारांसाठी काम करायचा. कदाचित सोनिया गांधी यांनीच उद्धव ठाकरे यांना उदय महावार याची ओळख करू दिली असेल, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

यशवंत जाधव हवाला ऑपरेटला कॅश देऊन त्या मोबदल्यात चेकच्या स्वरुपात पैसे घेत असत. यशवंत जाधव यांनी अनेक कंपन्या स्थापन केल्या होत्या. आयकर खात्याच्या हाती या सगळ्या व्यवहारांचे पुरावे लागले आहेत. उदयशंकर महावार याने आपण यशवंत जाधव यांच्याकडून पैसे घेऊन बँकेत टाकायचो, मग त्यांना चेक द्यायचो, हे मान्य केले आहे. यापैकी काही पैसा यूएईला पाठवण्यात आला होता. ईडी, आयकर खाते, कंपनी मंत्रालय आणि निवडणूक आयोग आम्ही सगळे बऱ्याच दिवसांपासून याचा पाठपुरावा करत होतो. अखेर आयकर खात्याने आज कारवाई केली आहे, असे किरीट सोमय्या यांनी केले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मराठीसाठी भांडणाऱ्यांना गुंड म्हणत असतील तर आम्ही गुंड आहोत - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया