(Uddhav Thackeray - Raj Thackeray) उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरवात झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. bmc निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे. या भेटीमध्ये मुंबईतील जागावाटपाबाबत ठाकरे बंधूंमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.