राजकारण

Uddhav Thackeray : 'काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती'

उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे विधानसभेतील पहिलेच भाषण चांगलेच गाजले आहे. यासोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हावाभावाचीही चर्चा रंगली आहे. यावरुन आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, असा टोला शिंदेंना लगावला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती. त्याला ब्रेक नव्हता. सुसाटत सुटली होती. अपघात तर होणार नाही ना असे सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते, असे त्यांनी म्हंटले होते.

तर, काल उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांचा माईकच खेचला. पुढे काय काय खेचतील ते माहित नाही, अशी टीका उध्दव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. तब्बल एक तास मुख्यमंत्र्यांनी भाषण केले. यामुळे त्यांच्या भाषणाची चर्चा चांगलीच रंगली आहे. यावरुन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही शिंदे-फडणवीसांवर निशाणा साधला होता. तर, विधानसभेनंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदेंना संतोष बांगर यांच्या बंडखोरीविषयी विचारले असता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांचा माईक घेत स्पष्टीकरण दिले होते. नेमके याचवरुन आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

दरम्यान, शिवसेना महिला संघटक आणि संपर्कप्रमुख, महिला विभाग संघटक यांची आज शिवसेनाभवन येथे बैठक पार पडली. अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना याप्रसंगी व्यक्त केल्या. आणि शिवसेनेच्या रणरागिणी शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेसोबत आणि उद्धव साहेब ठाकरे यांच्यासोबत कार्यरत राहतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनीही याप्रसंगी मार्गदर्शन केले. यावेळी ते बोलत होते.

महिलांना येथून पुढे आणलं पाहिजे असे म्हणत उध्दव ठाकरे म्हणाले, पुरुषांनी गद्दारी केली, महिला पाठीशी उभ्या राहिल्या, असे म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार