राजकारण

हिंदुत्वाशी गद्दारी...फडणवीसांची विचित्र स्थिती; उध्दव ठाकरेंचा हल्लाबोल, भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधले. यातीलच भाषणातील प्रमुख 10 मुद्दे मांडले आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्या होमपीचवर जाहिर सभा घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर शरसंधान साधले. यातीलच भाषणातील प्रमुख 10 मुद्दे मांडले आहेत.

सत्तेच्या लोभापायी १५ बळी

नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात उष्माघाताने 16 जणांचे बळी घेतले. ते सत्तेचे बळी होते.

गावठी कट्टा, गृहमंत्र्याच्या नागपुरात

शेतकऱ्याला पैसे हवे असतील तर त्याची जमीन, घर किंवा पत्नीचं मंगळसूत्र गहाण टाकावं लागतं. पण इकडे गावठी कट्ट्यावर पैसे देणारी अवलाद गृहमंत्र्यांच्या गावात आहे. हे आपलं दुर्भाग्य आहे.

फडणवीसांची विचित्र स्थिती

मी पुन्हा येईन, असे ते म्हणाले होते, परत आलो ते दोन जणांना घेऊन आले. फडणवीसांची विचित्र स्थिती झाली असून सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, अशी त्यांची अवस्था आहे.

युती का तोडली तो प्रसंग सांगितला

2014 मध्ये युती तोडून त्यांनी पाठित खंजीर खुपसला. त्यावेळची घटनाक्रम आपल्या डोळ्यासमोर आहे. संध्याकाळी एकनाथ खडसे यांनी फोन केला होता. आमच्या लोकांची इच्छा आहे की, शिवसेनेसोबत नको जाऊ या, असे त्यांनी सांगितले. आम्ही जे करतो, ते उघडपणे करतो. लपवाछपवी आमच्याकडे नाही.

संघाला तरी हिंदुत्व मान्य आहे का?

आज जे हिंदुत्व ते पुढे नेत आहे, ते आरएसएसला मान्य आहे काय? भाजप वाढावा म्हणून खस्ता खाणारे निष्ठावंत आज कोठे आहेत? सध्या भाजपला काय झाले आहे, त्यामुळे अस्वस्थता वाटत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर काही ठिकाणी भाजप पुन्हा शून्यावर जाईल, अशी स्थिती आहे.

हिंदुत्वाशी गद्दारी

2014 मध्ये त्यांनी युती तोडली. 2019 मध्ये विश्वासघात केला. हा विश्वासघात हिंदुत्वाशी आहे, ही गद्दारी धनुष्यबाणशी आहे, ही गद्दारी प्रभू रामचंद्रांशी आहे.

होऊन जाऊ दे चर्चा...

भाजपचे नाही म्हणजे होय असते, असे चालले आहे. भ्रष्टाचारी, भ्रष्टाचारी असा आरोप करायचे, भाजपात आले की स्वच्छ करून त्यांना मंत्री करायचे. राज्यात, देशात सध्या जे काही सुरू आहे, ते तुम्हाला पटते का? होऊन जाऊ दे चर्चा, असे कार्यक्रम आयोजित करा.

घर पेटवणं सोपं, त्यातील चूल पेटवणं

पंतप्रधान आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किती योजनांचा जनतेला लाभ मिळाला. या सर्व गोष्टींवर आता चर्चा होण्याची गरज आहे. घर पेटवणे सोपे असते, मात्र घरातील चूल पेटवणे महत्त्वाचे आहे.

एक देश एक पक्ष आम्ही होऊ देणार नाही

यांना ज्यांनी मोठे केले, ते त्यांनाच संपवायला निघाले आहेत. एक देश, एक कायदा, याला आमचा पाठिंबा असेल. मात्र एक देश, एक पक्ष हे आपण कधीही होऊ देणार नाही.

बावनकुळे म्हणजे शेपटी

प्रदेशाध्यक्ष म्हणजे शेपटासारखे असते, त्याने ना धड अब्रु झाकता येता, ना धड माशा उडवता येत, अशी त्यांची अवस्था झाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Niket Dalal Death: देशाचे पहिले दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलालांचे निधन; हॉटेलमधील मुक्काम ठरला अखेरचा!

Latest Marathi News Update live : राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांना तंबी

Ramayana Teaser : बहुचर्चित 'रामायण'चा टीजर प्रदर्शित, रणबीर कपूर आणि साई पल्लवीच्या लूकने वेधलं लक्ष

Laxman Hake : गिरगाव चौपाटीतील समुद्रात उतरून लक्ष्मण हाकेंचं आंदोलन; तर पोलिसांकडून धरपकड