Sanjay Raut, Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

'हल्लाबोल, आसूड आणि गौप्यस्फोट', उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित

मुलाखतीची उत्कंठा शिगेला

Published by : Shubham Tate

uddhav thackeray interview : राज्याच्या राजकारणात शिवसेना आजवरच्या सर्वात मोठ्या बंडाला सामोरी गेली. पक्षात उभी फूट पडल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पक्ष बांधणीच्या कामाला लागले आहेत. शिवसेना भवनात बैठका घेऊ लागले आहेत. दुसरीकडे आदित्य ठाकरे थेट मैदानात उतरून बंडखोरांच्या मतदार संघात जाऊन शिवसैनिकांशी शिवसंवाद यात्रेच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. बंडखोरांवर घणाघाती टीका करत आहेत. (uddhav thackeray interview teaser tweet by sanjay raut)

आतापर्यंतच्या सर्व घडामोडींवर आता स्वत: उद्धव ठाकरे आपली रोखठोक भूमिका मांडणार आहेत. शिवसेना खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या 'जोरदार' मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली