राजकारण

न्यायालयाचा निकाल येताच पाच मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधत दिला राजीनामा

सर्वोच्च न्यायालयाने विश्वसदर्शक ठरावास स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यानंतर पाच मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला.

Published by : Team Lokshahi

सर्वोच्च न्यायालयाने विश्वसदर्शक ठरावास स्थगिती देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ठाकरे सरकारच्या विरोधात गेला आहे. त्यानंतर पाच मिनिटांत मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधला. 15 मिनिटांचे भावनीक संवाद साधत त्यांनी राजीनामा दिला.

  • उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात आज कॅबिनेट बैठकीत घेतलेल्या निर्णय सांगितले. संभाजीनगर आणि धारशीव नाव देण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला नसल्याचे सांगितले. परंतु शिवसेनेतच जे घडले ते लोकच हा निर्णय घेतांना सोबत नव्हती.

  • राज्यपालांवर टीका करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही. विरोधकांनी पत्र देताच तातडीने आपण विश्वासदर्शक ठराव करण्याचे निर्देश दिले. परंतु दुसऱ्या बाजूला १२ आमदारांचा विषय जवळपास दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवला.

  • नाराज लोकांना मी वारंवार आवाहन केले. आजही या चर्चा करा, यावर बोललो. परंतु ते आले नाही. त्यांची नाराजी सांगितली नाही. काही टपरीवरच्या किंवा अगदी हाथभट्टी चावलणाऱ्य़ा लोकांना पदे दिली, प्रतिष्ठा दिली. तेच लोक आज विरोधात गेल्याची खंत त्यांनी व्यक्त केले.

  • मुंबईत संरक्षणाचा ताफा केंद्र सरकारने किती मोठा पाठवला. अगदी चीन सीमेवरील सैन्यपेक्षाही जास्त फौज पाठवली.

  • मुख्यमंत्रीपदासोबत विधान परिषद सदस्याचा राजीनामा देतांना देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. कारण मी पुन्हा येईन, असे बोललो नव्हतोच असे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची मी पुन्हा येईनची आठवण करुन दिली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा