राजकारण

Uddhav Thackeray on Ajit Pawar: या सगळ्या भोंदूगिरीमध्ये या माणसाकडून...; उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे हे अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानभवनात अजित पवार यांना भेटले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ७० हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप केले, त्यांच्याकडेच राज्याच्या तिजोरीच्या चाव्या दिल्या आहेत. त्यामुळे आता अजित पवारांवरील आरोप खरे की खोटे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

तसेच प्रशासन आणि त्यांचं खातं त्यांनी व्यवस्थित सांभाळलं होतं. यांच्या या सगळ्या भोंदूगिरीमध्ये या माणसाकडून अजित पवार काही झालं तर पाहावं म्हणून मी त्यांची भेट घेतली. मी त्यांना सांगितले सत्तेच्या साठमारीत राज्याला आणि राज्यातील जनतेला विसरू नका.अडीच वर्ष ते आमच्याबरोबर होते. या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिला. तसेच त्यांच्याकडे तेव्हा आणि आत्ताही अर्थखातं देण्यात आलं आहे. असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा