राजकारण

आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र,अरे लाज वाटली पाहिजे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Published by : Siddhi Naringrekar

ठाण्यात गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी मणिपूरच्या घटनेवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, आजचं सरकार जे बसलं आहे ते ध्रुतराष्ट्र आहे. आपल्याही देशात दोन महिलांसोबत जे केलं ते व्हिडीओमुळे समोर आलं. तिथले मुख्यमंत्री म्हणत आहेत की, अशा घटना भरपूर घडल्या आहेत. अरे लाज वाटली पाहिजे. मणिपूर जळत आहे. हेच आपलं हिंदू राष्ट्र आहे? मी मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा बोलायचं सुरु होतं. ज्या हनुमानने सीतेसाठी लंका जाळली, सीता हरण झालं म्हणून रामायण घडलं, द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं.

तसेच ते पुढे म्हणाले की, राष्ट्रपती महोदया तुम्ही ज्या राष्ट्रपती आहेत त्या देशातील महिलांची आब्रू भर रस्त्यावर लुटली जात आहे. आपल्याला काही संवेदना नाहीत का? तिथल्या राज्यपाल महिला आहेत. त्या काहीच करत नाहीत. या लोकांनी नकली हिंदूंनी सभास्थळी जावून गोमूत्र शिंपडलं. अरे माणसासारखी माणसं सभेला आली होती आणि त्यांना तुम्ही अपित्र मानता? आमचं हिंदुत्व हे हृदयात राम आणि हातात काम असं आमचं हिंदुत्व आहे. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : मुख्यमंत्र्यांनी केली पंढरपुरातील विठ्ठलाची महापूजा

आजचा सुविचार

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींची रखडलेली कामे होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर