Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, इर्शाळवाडीत दुर्घटना घडल्यानंतर आज मला समजतंय की ते दिल्ली दरबारी गेले आहेत. हे कुठलं राजकारण आहे. अजूनही तिकडे शोधकार्य सुरु आहे. आणि मुख्यमंत्री हे मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. कोणाला मुजरा मारतायत आणि कशासाठी असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.