राजकारण

Uddhav Thackeray : आम्ही खंजीर खुपसला? मग राष्ट्रवादीने काय केलं?; उद्धव ठाकरेंचा सवाल

ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Uddhav Thackeray : ठाकरे गटाकडून "आवाज कुणाचा" पॉडकास्ट सुरू करण्यात आले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा पॉडकास्ट शिवसेनेच्या युट्युब चॅनेलवर सुरू करण्यात आले आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून ठाकरे गट तळागाळातील कार्यकर्ता आणि लोकांपर्यंत माहिती पोहोचवणार आहे. आवाज कुणाचा या पॉडकास्ट मालिकेत उद्धव ठाकरे यांची मुलाखत प्रसारित करण्यात आली.

यावेळी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना फोडून आणि अपक्षांना सोबत घेऊन तुम्ही मजबूत सरकार स्थापन केलं होतं ना. मग तरीही राष्ट्रवादी का फोडलीत?शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला म्हणता, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं? तुम्ही राष्ट्रवादी का फोडलीत? राज्यात तुमचं सरकार होतं ना.

तसेच नरभक्षक असतात तसे हे सत्ताभक्षक आहेत. सत्तालोलूपता सत्ताधाऱ्यांमध्ये आली आहे. त्यांना माणसं दिसेनाशी झाली आहेत. राष्ट्रवादीसोबत जाणं ही भाजपची कूटनीती आहे की मेतकूट नीती आहे हे मला माहीत नाही. पण या कूटनीतीला आता ककुटून टाकण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर घोटाळ्याचे भयंकर आरोप केले होते. त्या आरोपांचं काय झालं? त्या घोटाळ्यांच्या पैशांचं काय झालं? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Eknath Shidne : पुण्यात 'जय गुजरात' घोषणेवरून वाद; शिंदे गटाचं स्पष्टीकरण आलं समोर

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांचीही हजेरी

Sudhir Mungantiwar : 'हिंदी शिकणं अवमान, पण इंग्रजी शिकणं अभिमान, असं कसं?'; सुधीर मुनगंटीवार यांचा टोला

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून