राजकारण

काही लोकांच्या डोक्यात हवा गेल्यानं ते फुगलेत; उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर असून त्यांनी सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

जळगाव : उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते जळगावात सरदार वल्लभभाई पटेल व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण झाले आहे. यादरम्यान उध्दव ठाकरेंनी सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. एकनाथ शिंदेंना शिवराय आणि वल्लभभाईंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

काही लोकांच्या डोक्यात हवा गेल्यानं ते फुगलेत. तो फुगा टाचणी मारून फोडायचा, असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जायला वेळ आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांना जरांगे पाटलांना भेटायला वेळ नाही, असाही निशाणा त्यांनी मुख्यमंत्र्यांवर साधला आहे.

मी शिवसेनेला कमळाबाईची पालखी होऊ देणार नाही, असं बाळासाहेब म्हणाले होते. कमळाबाई हा शब्द शिवसेनाप्रमुखांचा आहे. गेल्या 25 वर्षात भाजपची सेना कधीच झाली नाही, मग काँग्रेस कशी होईल? कमळाबाई हा शब्द माझा की शिवसेनाप्रमुखांचा, मग मी वापरला आहे तो गुन्हा आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवराय आणि वल्लभभाईंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरातील 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी

Latest Marathi News Update live : इगतपुरीत मनसेचं 3 दिवसीय शिबीर

Pravin Gaikwad : प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक प्रकरण; आरोपी दीपक काटे आणि भवानीश्वर शिरगिरे यांना अटक

Golden Temple : अमृतसरमधील सुवर्ण मंदिर आरडीएक्सने उडवून देण्याची धमकी