राज्यात एकीकडे राजकीय घडामोडी घडत असताना अशातच शिवसेना ठाकरे गट अणि वंचित बहुजन बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या चर्चा रंगत आहे. नुकताच मुंबईत प्रबोधनकार ठाकरे डॉट कॉम या वेबसाईटच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर पहिल्यांदाच एकाच मंचावर दिसले होते. त्यामुळे राज्यात शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येणार अशा चर्चांनी जोर धरला. त्यावरच आता राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी मोठे विधान केले आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, “जे समविचारी लोकं एकत्र येऊन समोरच्या सत्ताधार पक्षाचा पराभव करण्यासाठी आणि मतांची विभागणी होऊ न देण्यासाठी एकत्र येत असतील तर आमची तयारी आहे. पण फक्त एकाबाजूची तयारी असून चालणार नाही. दोन्ही बाजूने तयारी असावी लागते”, असं अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, “आम्ही अनेकदा अनेकांशी चर्चा केलीय. आरपीआयमध्ये विविध पक्ष आहेत. ते चर्चा करत असतात. त्यापैकी अनेकांसोबत आम्ही आघाडी करुन निवडणुका लढवल्या. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा करायला केव्हाही तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.