उद्धव ठाकरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल भाष्य केले आहे. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकणावर संताप व्यक्त केला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, "मला असे वाटत आहे की मुंढे यांच्या राजीनाम्याबाबत जे काय बोलायचे होते ते महाविकास आघाडीच्या आमदारानी बोलून झाले आहे. जे काही व्हिडिओ फोटो आले ते आधी आले की नव्हते याबाबत चर्चा झाली आहे. दोन एक महिने या सरकारने हालचाल केली नव्हती हे आश्चर्यजनक आहे. जनप्रक्षोभ होऊ द्यायचा नसेल तर बाकीच्या गोष्टींबाबत हालचाल केली पाहिजे. गुंडागर्दी आणि भ्रष्टाचार मुक्त करायचे असल तर आताच कारवाई करणे अपेक्षित आहे. या सरकारची नाही तर महाराष्ट्राची बदनामी होत आहे.
त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेतेपदाबद्दलही भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, "आज शिवसेनेने विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा केला आहे. एकत्रित निर्णय घेऊन आम्ही पुढे वाटचाल करणार आहोत. विरोधी पक्षेनेते पदासाठी आज भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केली आहे. लवकरच यावर निर्णय होईल येत्या बजेट पूर्वी निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे