CM Uddhav Thackeray team lokshahi
राजकारण

भाजपसोबत जाण्यासाठी आमदारांचा माझ्यावर दबाव, उद्धव ठाकरेंनी सांगितली शिंदेंशी झालेली 'ती' चर्चा

हिंदुत्ववादी असूनही 2014 ला भाजपने युती तोडली; उद्धव ठाकरे

Published by : Shubham Tate

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील राजकीय खळबळ सातत्याने वाढत आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे समर्थक बंडखोर आमदारांना पुढे येऊन त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे उद्धव यांची बाजू घेणारी शिवसेना आता जुना पक्ष राहिला नसल्याचे एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे. अपक्ष आणि शिवसेनेचे 42 हून अधिक आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. म्हणजेच खरी शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. एवढेच नाही तर शिंदे यांनी एक दिवस अगोदर महाराष्ट्र विधानसभेच्या उपसभापतींना 34 आमदारांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवले असून त्यामध्ये शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाच्या मुख्य व्हीपला हटवण्यास सांगण्यात आले आहे. (Uddhav Thackeray said that the discussion with Eknath Shinde)

याच पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करत जनतेशी संवाद साधला, यावेळी बोलताना ते म्हणाले की, बंडखोर आमदारांकडून शिवसैनिकांच्या मनात संभ्रम निर्माण केला जातोय. एकदा बोलतात, मुख्यमंत्री भेटत नाही, एकदा बोलतात फंड देत नाहीत. नेमकं काय ते यांनाच समजत नाहीये. मी एकदा एकनाथ शिंदे यांनाच बोलवून जबाबदारी दिली होती. राष्ट्रवादी त्रास देत असल्याचे तेव्हा त्यांनी सांगितलं होतं. तसेच भाजपसोबत जाण्यासाठी आमदारांचा माझ्यावर दबाव आहे असं मला शिंदेंनी सांगितलं होतं.

त्यावेळी मी त्यांना सांगितलं की, ज्या भाजपने अपमान केला त्यांच्यासोबत कसं जायचं. मात्र, ज्या भाजपने चौकशा लावल्या त्यांच्यासोबत कसं जायचं. तसेच सर्वांना आमदारांना मान्य असेल तर एक घाव दोन तुकडे करायला तयार आहोत, असेही सांगितलं होतं. तसेच भाजपने व्यवस्थित प्रपोजल ठेवणं गरजेचं आहे, असेही मी शिंदेंना सांगितलं होतं.

कुणी कुटुंबाची बदनामी करत असेल तर त्यांच्यासोबत मला जायचं नाही. पहिले आमदार माझ्यासमोर येऊद्या माझ्यासमोर बोलूद्या मग काय तो निर्णय घेता येईल. आमदार माझ्यासमोर येऊन मला बोलले असते तेव्हाच मार्ग निघाला असता असं ही मत यावेळी उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

मात्र हे सोडून ते सुरतला गेले, आता कुठे कुठे जात आहेत. आमदारांची जी कामं होती तेव्हा ती कामं मी केली. मला कधीच मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता. मात्र माझ्या कुटुंबाचा एक अधिकार आहे, शिवसेना म्हणजे माझं कुटुंब आहे. शिवसैनिकांनी सांगितलं होतं की तुम्ही उद्धवला जपा, आदित्यला जपा. पण केवळ साहेबांनी सांगितलं म्हणून मी तुमच्याशी कसाही वागेल असं होणार नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा