Uddhav Thackeray Team Lokshahi
राजकारण

मुलं पळवणारे बघितले पण बाप पळवणारी औलाद राज्यात जन्माला आलीय, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा, अमित शहा यांना आव्हान

Published by : Sagar Pradhan

राज्यात राजकीय घडामोडी वाढत असताना, दसरा मेळावा आणि अनेक विषयावरून सध्या शिंदे गटात आणि शिवसेनेत वाद उफाळत असताना त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी बंडखोरीनंतर पहिल्यांदाच राज्यात सभा घेतली आहे. या सभेत त्यांनी शिंदे गटावर आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता, उद्धव ठाकरे म्हणाले की, बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रभर फिरतेय, ठाणे- पालघरमध्ये मुली विकल्या जात आहेत आणि आपले मुख्यमंत्री फिरतायत. गल्लीत गोंधळ आहे, आणि हे दिल्लीत मुजरा करत फिरतायत आजही हे दिल्लीत फिरतायत. मुंबई हे देशाच आर्थिक केंद्र आणि आणि तेथून तुम्ही आर्थिक केंद्रच पळवता? वेदांतावरून धादांत खोट बोलता? कुणाशी भांडताय? आम्हीं येऊ तुमच्यासोबत, आणतो म्हणा, परत आणा. मिंधे गट म्हणजे गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा, अशी टीका वेदांता प्रकल्पावरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.

ठाकरेंचे अमित शहा यांना आव्हान

अमित शहा यांनी काही दिवसापूर्वी मुंबई दौऱ्यावर असताना शिवसेनेवर टीका केली होती. त्यालाच आज उद्धव ठाकरे यांनी जोरदार उत्तर दिले आहे.आज शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेचे हिंदुत्व कळतंय, मराठी - हिंदू सोबत उत्तर भारतीय, गुजराती सर्व आमच्या सोबत आहेत. तुमचे चेले-चपाटे इकडे जे बसले आहेत त्यांना सांगा मुंबई महापालिका निवडणूक एक महिन्यात घेऊन दाखवा आणि त्यासोबतच विधानसभेची देखील निवडणूक लावून दाखवा, असे थेट आवाहन उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, मी अमित शाह ना आवाहन देतोय, तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाही तुमचे कोणतेही डावपेच आता यशस्वी होणार नाहीत. कुस्ती आम्हांलाही येते, तीच आमची परंपरा आहे. पाहू कोण कुणाच्या पाठीला माती लावतो.

मुंबईवर लचके तोडणारी गिधाड, त्यांची औलाद फिरायला लागली आहे. शिवाजी महाराजांच्या काळात देखील आदिल शहा, हे शहा, ते शहा असे अनेक चाल करून आलेले. आताही त्या कुळातील येऊन गेले. अमित शाह म्हणाले, शिवसेनेला जमीनीवर आणू. तुम्हीं प्रयत्न कराच, तुम्हांला आम्हीं आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. अशा शब्दात त्यांनी शहाना सुनावले आहे.

भाजप कडून वारंवार होणाऱ्या टीकेवर उत्तर देतांना ठाकरे म्हणाले की, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? सगळे बाहेरचे घेतले भरले आहेत. वंशवाद म्हणजे काय? मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. तुमचा वंश कुठला? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला केला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pandharpur Rain Update : पंढरपूरला पूरसदृश परिस्थिती; चंद्रभागा वाळवंटातील मंदिरे पाण्याखाली

ITR Filing Extension : करदात्यांना दिलासा; आयटीआर फाइल करण्यासाठी मुदतवाढ

Beed Rain Update : बीडमध्ये पावसाचा कहर; आज शाळांना सुट्टी जाहीर

Latest Marathi News Update live : काँग्रेस नेते नाना पटोले, विजय वडेट्टीवार अजित पवारांच्या भेटीला