राजकारण

उद्धव ठाकरेंची नवी खेळी; निवडणूक आयोगाला सुचवली 'ही' तीन नावे अन् चिन्हे

निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाने तीन नावे आणि चिन्हांची यादी दिली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या वादावर निवडणूक आयोगाने तात्पुरता तरी पडदा टाकला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. हा निर्णय अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीपर्यंत लागू असणार आहे. या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे गटाने तीन नावे आणि चिन्हांची यादी दिली आहे. यासंबंधी सूत्रांनी माहिती दिली आहे.

पक्षाच्या नावावर आणि चिन्हावर दोन्ही गटांनी केलेल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश जारी करून दोघांनाही आपापल्या पक्षांसाठी सोमवारपर्यंत तीन नवीन नावे आणि चिन्हे सुचवण्यास सांगितले आहेत. आयोग त्यांना दोन्ही गटांनी सुचविलेले नाव आणि निवडणूक चिन्हे वापरण्याची परवानगी देईल. यानुसार ठाकरे गटाने नावासाठी 'शिवसेना बाळासाहेब ठाकरे' ही पहिली पसंती, तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' ही दुसरी पसंती असल्याचे समजत आहे. तर, चिन्हासाठी प्रथम त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन चिन्ह सुचविले आहेत. परंतु, ही तिन्हीही चिन्हे निवडणूक आयोगाच्या यादीत नाहीत.

या चिन्हापैकी अथवा दुसरे कोणते चिन्ह ठाकरे गटाला मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जवळ आल्याने शिंदे गटाच्या विनंतीवरून आयोगाने अंतरिम आदेश जारी केला आहे. तर, एकनाथ शिंदे गटानेही बाळासाहेब ठाकरेंच्या नावाला पसंती दर्शविल्याचे समजत आहेत. यामुळे पुन्हा शिवसेना-शिंदे गटात वादाची ठिणगी पडणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेला 1989 साली धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह कायमस्वरूपी मिळाले होते. त्यापूर्वी ती तलवार आणि ढाल, नारळाचे झाड, रेल्वे इंजिन, कप आणि प्लेट अशा अनेक निवडणूक चिन्हांवर शिवसेना लढली होती. परंतु, एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे सरकारविरोधात बंड केले होते. यानंतर शिंदे यांनी भाजपशी हातमिळवणी करून महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन केले. नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री, तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. त्यानंतर एकीकडे शिंदे गट शिवसेनेवर दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशानुसार दोन्ही शिबिरांना आता नवीन नावांची निवड करावी लागणार आहे. त्यांना वेगवेगळी निवडणूक चिन्हे दिली जाणार आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uddhav Thackeray on Eknath Shinde : "एका गद्दाराने काल 'जय गुजरात' अशी घोषणा केली" उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात चिमुकलीने जिंकली मनं ! राज ठाकरेंना म्हणाली 'I love You तर...

Raj & Uddhav Thackeray Melava : सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे यांना खेचलं, स्टेजवर नेमकं काय घडलं?

Sushil Kedia Apologizes : मराठीबद्दल वादग्रस्त विधानानंतर अखेर सुशील केडियाने मागितली माफी