Chitra Wagh | Urfi Javed Team Lokshahi
राजकारण

अंतर्वस्त्राचा उल्लेख करत उर्फीने पुन्हा डिवचले; म्हणाली, चित्राताई ग्रेट है

उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरुच

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : उर्फी जावेद आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. तिचे थोबाड फोडणार असल्याचे म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीविरोधात पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. तरीही उर्फी जावेद शॉर्ट ड्रेस घालून चित्रा वाघ यांना डिवचत आहे. अशातच उर्फीचे आणखी एक ट्विट चर्चेत आले आहे. या ट्विटमध्ये चित्राताई ग्रेट आहे, असे उर्फीने म्हंटले आहे.

चित्रा वाघ यांच्या आरोपांवर उर्फी जावेद ट्विटरच्या माध्यमातून उत्तर देत आहे. उर्फीनं म्हंटले की, उर्फी के अंडरवेअर में छेद है, चित्राताई ग्रेट है, असे ट्विट तिने केले आहे. या ट्विटवरुन आता नेटकऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे. एका युजर्सने उर्फीने दिवसा दाखवले चित्राला तारे, आजपासून उर्फीचं आडनाव वाघमारे, अशी कमेंट केली आहे. तर, दुसऱ्याने उर्फी चित्रा वाघला राजकीय संन्यास घ्यायला भाग पाडणार असल्याचे म्हंटले आहे. आणखी एका युजरने मैदान उर्फीच मारणार... काकूंचा गेम झाला, असे म्हणत चित्रा वाघांची खिल्ली उडवली आहे.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी काल माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा उर्फी जावेदवर निशाणा साधला होता. मला यावर काहीही बोलायचं नाही. तिने कितीही काहीही लिहिलं, शब्दांची मोडतोड केली, मला काहीही बोलली तरी हा नंगानाच आम्ही छत्रपतींच्या महाराष्ट्रात चालू देणार नाही ही आमची भूमिका कालही होती, आजही आहे आणि यापुढेही राहिल. आमच्याकडे प्रत्येक रोगावर औषध आहे. माझ्यामुळे तिला प्रसिध्दी मिळली असून तिचे फॉलोअर्स वाढले आहेत, असे चित्रा वाघ यांनी म्हंटले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी

गरमागरम डाळ, भात अन् त्यावर तूप घालून खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का? जाणून घ्या